एफएक्यू

faq सतत विचारले जाणारे प्रश्न

  • general enquiry

    गारव्याच्या सामान्य सूचना

  • settings

    देखभालीविषयी चौकशी

  • warranty

    समस्यानिवारण मार्गदर्शहवेचे

  • saftey

    सुरक्षितता आणि वारंटी

इतर काही प्रश्न? आमच्याकडे उत्तरे आहेत

आमच्याशी संपर्क साधा
settings

देखभालीविषयी चौकशी

  • A. हनिकोम्ब पॅड केव्हा स्वच्छ करावे?  

    1. हनिकोम्ब माध्यम प्रत्येक दोन महिन्यांना किंवा त्या आधी गरजेनुसार स्वच्छ करायला पाहिजे.
    2. कमीत कमी आठवड्यातून एकदा पाण्याची टाकी खाली करून ती ताज्या पाण्याने भरल्यास खनिज साचण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. जर हनिकोम्बवर साचलेले खनिज राहिले असेल तर त्याला बाहेर काढून ताज्या पाण्याने धुवायला हवे.
    3. हनिकोम्बचे स्वच्छ करण्चाचे प्रमाण तिथल्या हवेवर आणि पाण्याच्या स्थितीवर अवलंबून आहे. ज्या क्षेत्रात पाण्यामध्ये खनिजाचे प्रमाण जास्त आहे, तिथे हनिकोम्ब माध्यमावर खनिज साचू शकते आणि ते हवेच्या प्रवाहावर मर्यादा आणते.
  • B. हनिकोम्ब पॅड कसा स्वच्छ करावा ?  

    1. इलेक्ट्रिक बोर्डाला प्लग लावा आणि उपकरण सुरू करा.
    2. एकदा स्वच्छ करणे झाले म्हणजे पुन्हा ते उपकरण जोडा.
    3. मागची धातूची जाळी जोपर्यंत पूर्ण निघत नाही तोपर्यंत वर ओढा. आता तुम्हाला हनिकोम्ब माध्यम दिसेल. हनिकोम्ब माध्यम ताज्या पाण्याने धुवा.
    4. स्क्रू ड्रायव्हरने स्क्रू काढा.
    5. उपकरण बंद करा आणि भिंतीवरच्या इलेक्ट्रिक बोर्डाला लावलेली कॉर्ड काढा. नंतर उपकरण फिरवून मागची बाजू पुढे आणा. तिथे तुम्हाला धातूची जाळी दिसेल. ​​​​​​
  • C. टाकी स्वच्छ कशी करावी?  

    1. बऱ्याच काळापासून तुम्ही कुलरचा उपयोग केला नसेल तर ते पुन्हा उपयोगात आणायच्या आधी पाण्याची टाकी कमीत कमी दोनदा धुवायला हवी.
    2. आता पाण्याची टाकी कमाल पातळीपर्यंत भरा, ५ मिनिटे थांबनू पुन्हा एकदा पाणी खाली करा. या प्रक्रियेसाठी स्वच्छ पाणी वापरा म्हणजे जास्तीत जास्त धुळीचे कण आणि प्रदूषक पूर्णपणे दूर होतील.
    3. पाण्याची टाकी रिकामी केल्यानंतर पाणी काढण्याच्या छिद्राला पूर्वीच्या जागेवर टोपण लावा.
    4. जिथे रिकामे करता येईल त्या ठिकाणी उपकरण घेऊन जा. पाणी बाहेर काढण्याच्या छिद्रावरचे टोपण काढा (जे टाकीच्या बुडाला असते) आणि टाकी रिकामी होऊ द्या.
    5. एकर कुलर बंद करून वीज पुरवठा खंडित करा.
warranty

समस्यानिवारण मार्गदर्शहवेचे

  • A. उत्सर्जन होत नसेल तर काय करावे?  

    1. कॉर्ड इलेक्ट्रिक बोर्डाला लावली की नाही ते तपासा - कॉर्ड इलेक्ट्रिक बोर्डाला लावलेली आहे आणि वीज पुरवठा सुरू आहे याची खात्री करून घ्या.
    2. वीजपुरवठा सुरू नाही -नियंत्रण पॅनलवरचे यांत्रिक बटण फिरवून उपकरण सुरू करा.
    3. मोटर विभाग-सर्व्हिस सेंटरशी संपर्क करा.
  • B. कुलर आवाज करत असेल/गारवा देत नसेल तर काय करावे ?  

    1. पंप सुरू केला की नाही ते तपासा. - नियंत्रण पॅनलवर. गारवा देणारे फंक्शन सुरू करा.
    2. पाण्याची पातळी कमी झाली किंवा टाकीत पाणी आहे की नाही ते तपासा. -‘कुल’ ह्या फंक्शनची निवड केल्यास पंप सुरू होतो आणि टाकीमध्ये जर कमी पाणी असेल किंवा पाणीच नसेल तर पंप आवाज करतो. अशा परिस्थितीत पाण्याची टाकी भरा.
    3. पंपाचे काही नुकसान झाले का ते तपासा. - दुरुस्तिसाठी सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधा.
  • C. कुलर विचित्र वास सोडत असेल तर काय करावे?  

    1. जर कुलर नवीन असेल- ही सामान्य घटना आहे. उपकरण पहिल्यांदाच वापरत असाल तर गारवा देणाऱ्या हनिकोम्ब माध्यमाला वास असतो ; पण वापरायला लागल्यावर तो एका आठवड्याच्या आतच निघून जातो.
    2. कुलरचा वापर केला असेल तर - तिथे बुरशीची समस्या असू शकते
      ही समस्या निवारण्यासाठी :
      १. टाकीमध्ये पाण्याची स्थिती तपासा. जर पाणी शिळे असेल तर टाकी स्वच्छ करा आणि ताज्या पाण्याने भरा.
      २. गारवा देणारे हनिकोम्ब माध्यम स्वच्छ करा.
      ३. समस्या चालूच राहिली तर सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधा.
warranty

सुरक्षितता आणि वारंटी

  • A. वारंटीची मुद्दत  

    1. उपकरण अनधिकृत व्यक्तीकडून उघडले गेलेले किंवा त्या मध्ये बदल केलेला नाही.
    2. अधिकृत विक्रेत्याची सही असलेले वारंटी कार्ड आणि रोख पावती तक्रारीसोबत सादर केली  आहे.
    3. हस्तपुस्तिकेत दिलेल्या सूचनांप्रमाणे उपकरण बसविले आहे, वापरले आहे आणि त्याची देखभाल केली आहे.
  • B. वारंटी केव्हा लागू होत नाही ?  

    1. पोपडे निघणे,पोचे पडणे किंवा आवरणाचे नुकसान झाले असेल तर.
    2. जे भाग बेकलाईट, यूरिया, एबीएस, एसएएन अशा साहित्यापासून बनलेले आहेत आणि जसे प्लॅस्टिक साहित्य रबर आणि कॉर्ड यांचे नुकसान झाले असेल तर.
    3. भागाची सामान्य झीज झाली असेल.
    4. अपघातामुळे किंवा ग्राहकाकडून अयोग्य हाताळण्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे झालेले नुकसान
  • C. सुरक्षितेविषयी सूचना  

    1. तुमचा कुलर २३० Volt AC, ५० Hz. वर चालतो. घरातले व्होल्टेज उपकरणाच्या वैशिष्ट्याप्राणे अनुकूल आहे की नाही ते तपासून सुनिश्चित करा.
    2. उत्पादन वापरायच्या आधी त्याचे पॅकेजिंग काढून ते चांगल्या स्थितीत आहे की नाही ते तपासून पहा.
    3. कोणतेही उत्पादन त्याची कॉर्ड किंवा प्लग खराब झाले असेल तर चालू करू नका. या उपकरणाला विस्तारित कॉर्ड वापरू नका अशी आम्ही शिफारस करतो.
    4. आच्छादन नसलेली विजेची कॉर्ड वापरू नका. किंवा मग तिला आच्छादन लावा. पाय अडकून पडेल अशा क्षेत्रापासून कॉर्ड दूर ठेवा.
    5. नेहमी पाण्याची टाकी भरायच्या आधी उपकरणाचा विद्युतप्रवाह बंद करा.
    6. नेहमीच उपकरण स्वच्छ करायच्या, सर्व्हिसिंग करायच्या किंवा जागा बदलायच्या आधी विद्युतप्रवाह बंद करा.
    7. इलेक्ट्रिकल बोर्डावरून कॉर्ड काढताना कॉर्डच्या शेवटी असलेल्या प्लगला घट्ट पकडून ओढा. कॉर्डला कधीच ओढू नका.
    8. ज्या ठिकाणी पेट्रोल, पेंट किंवा इतर ज्वालाग्रही वस्तू साठवलेल्या असतील अशा ठिकाणी उपकरण वापरू नका.
    9. ‘कुल’ ह्या सेटिंगचा वापर करताना पाण्याची टाकी भरलेली आहे या गोष्टीची खात्री करा. रिकामी टाकी असताना ‘कुल’ ह्या सेटिंगचा कुलरमध्ये वापर केल्यास पाण्याच्या पंपाला हानी पोहचू शकते.
    10. कुलरचे कोणतेही इलेक्ट्रिकल किंवा यांत्रिक कार्य दुरुस्त करण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्यास वारंटी अग्राह्य ठरते.
    11. उपकरणाचे हवेचे इन्लेट किंवा आऊटलेट झाकू नका. त्यामुळे मोटारीचे नुकसान होऊ शकते.
    12. कोणतीही वस्तू व्हेन्टीलेशन किंवा उत्सर्जन द्वारात घुसडू नका किंवा जाऊ देऊ नका. असे झाल्यास उपकरणाची हानी होऊन त्यामुळे विजेचा धक्का किंवा आग लागू शकते.
    13. हनिकोम्ब माध्यम काढून टाकलेले असताना उपकरण चालू करू नका. ह्यामुळे मोटारीवर अधिभार पडून तिचे नुकसान होईल.
    14. लक्ष नसताना उपकरण जास्त काळासाठी तसेच चालू राहू देऊ नका.
    15. मुलांना ह्या उपकरणाशी, पॅकेजिंगशी किंवा प्लॅस्टिक पिशव्यांशी खेळू देऊ नका.
    16. उपकरण खराब झाले असेल किंवा खराब कार्य करत असेल तर ते वापरणे बंद करा. समस्यानिवारण विभाग पहा आणि व्यावसायिक सल्ला घ्या.
    17. उपकरण समांतर जागेवर ठेवा. हे उत्पादन ओलसर किंवा दमट ठिकाणी वापरणे अपेक्षित नाही.
    18. स्नानगृहात वापरू नये. पाण्याच्या पात्रात पडेल अशा ठिकाणी उपकरण कधीच ठेवू नका.
    19. उपयोगात नसताना कोरड्या ठिकाणी ठेवून द्या. हे उपकरण ज्या व्यक्ती (मुले,प्रौढांसकट) शारीरिक, इंद्रियगोचर, मानसिक दृष्ट्या दुर्बल आहेत किंवा ज्यांच्याकडे अनुभवाची आणि ज्ञानाची कमी आहे त्यांनी वापरणे अपेक्षित नाही जोपर्यंत त्यांच्या सुरक्षेतेची जबाबदारी असलेली व्यक्ती त्यांना उपकरण वापरासंबधीचे मार्गदर्शन किवा सूचना देत नाही.
    20. कुलर हलविण्यासाठी बाजूचे हॅण्डल पकडा.